Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: सहा महिन्‍यांपासून पत्‍नी विभक्‍त; नैराश्यातून शिक्षकाचे टोकाचे पाऊल

सहा महिन्‍यांपासून पत्‍नी विभक्‍त; नैराश्यातून शिक्षकाचे टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील वाघनगर- जिजाऊनगरातील ४३ वर्षीय शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेश बन्सीलाल फुलपगारे, असे मृत (Teacher) शिक्षकाचे नाव आहे. (Maharashtra News)

सावखेडा (ता. जळगाव) शिवारातील विवेकानंद प्रतिष्ठानच्या मूकबधीर विद्यालयात राजेश बन्सीलाल फुलपगारे शिक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची पत्नी मालेगाव येथे विभक्त राहत असल्याने ते घरी एकटेच राहत होते. कौटुंबीक वादातून गेल्या काही महिन्यांपासून फुलपगारे प्रचंड नैराश्येत होते. घरात एकटेच वास्तवयास होते.

शेजाऱ्यांना शंका आल्‍याने झाला उलगडा

गेल्या रविवार (ता. २५) पासून शाळांना नाताळाच्या सुट्ट्या असल्‍याने फुलपगारे हे घरीच होते. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते घराबाहेर आलेच नाही, म्हणून त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना शंका आली. राजेश फुलपगारे घरातून बाहेर येत नाहीत. त्यामुळे शेजाऱ्यांनी कुत्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले. त्यांना राजेश यांनी आतून दरवाजा बंद करून गळफास घेतल्याचे आढळून आले.

पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार अनिल फेगडे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृत फुलपगारे यांनी साधारण दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्‍हा रुग्णालयात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त ९६ तासात एलपीजी सिलिंडर घरपोच होणार, अट फक्त एकच

LPG Shortage : धक्कादायक! जालन्यामध्ये ११० सिलिंडरची चोरी, एजन्सीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी डाव साधला

Long Or Storng Hair Oil: लांब आणि मजबूत केसांसाठी कोणते तेल लावायचे?

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवड

Namo Shetkari Yojana: राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात ₹२००० जमा होणार; 'नमो शेतकरी'साठी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT