suicide saam tv
महाराष्ट्र

धक्‍कादायक..अत्याचारातून सहा महिन्‍यांची गर्भवती अपंग महिलेची आत्महत्या

धक्‍कादायक..अत्याचारातून सहा महिन्‍यांची गर्भवती अपंग महिलेची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मेहुण्यासह तिन जणांनी अत्याचार करून गर्भवती केलेल्या ३७ वर्षीय अपंग महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस (Police) ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news Suicide of a six month pregnant disabled woman due to torture)

चोपडा (Chopda) तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय महिला आपल्या भावासह वास्तव्याला होती. सदर महिला ही अपंग असल्याने ती भावाकडे राहत होती. दरम्यान मेहुण्यासह इतर तिन जणांनी तिच्‍या अपंगत्‍वाचा फायदा घेत वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली.

त्रास असह्य झाल्‍याने टोकाचे पाऊल

त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने टोकाचे पाऊल उचलले. पंचक गावाच्‍या शिवारातील पुष्‍पा पाटील यांच्‍या शेतातील कोरड्या विहरीत पिडीत महिलेने २४ जानेवारीला सकाळी साडेआठ वाजेपुर्वी आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून देविदास पुंडलिक सपकाळे, अविनाश देविदास सपकाळे, आनंद देविदास सपकाळे यांच्‍या विरूद्ध अडावद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील उच्चभ्रू परिसरात देहविक्रीचा व्यवसाय; मसाज पार्लरच्या नावाखाली तरूणींचा बाजार

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Education News: ITI आणि पॉलिटेक्निकमध्ये नवे कोर्स, राज्य सरकारनं केली घोषणा, वाचा नेमका प्लान काय?

मोठी राजकीय उलथापालथ होणार, आगामी निवडणुकीत महायुती अन् महाविकास आघाडीही फुटणार, संकेत मिळाले

मंदीचं सावट? TCS मधून ८०,००० जणांना काढल्याचं वृत्त, आयटी क्षेत्रात खळखळ

SCROLL FOR NEXT