Suicide case 
महाराष्ट्र

क्षणापुर्वी गप्‍पा..आई बाहेरून आली अन्‌ बसला धक्‍का; उच्‍चशिक्षीत तरुणाची आत्‍महत्‍या

क्षणापुर्वी गप्‍पा केल्‍या..बाहेरून आली अन्‌ आईला बसला धक्‍का; उच्‍चशिक्षीत तरुणाची आत्‍महत्‍या

Rajesh Sonwane

जळगाव : एलएलबीचे शिक्षण झालेल्या २४ वर्षीय उच्‍चशिक्षित तरुणाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. दरम्‍यान सकाळी या युवकाने वृत्‍तपत्राचे वाचन केले. यानंतर कुटुंबिय बाहेर गेल्‍यानंतर गळफास घेतल्‍याचे सांगितले जात आहे. (jalgaon-news-suicide-case-today-morning-young-boy-suicide-in-home)

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात सदर घटना घडली आहे. रोहन इंदरलाल मेहता (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, रोहन याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही.

लॉकडाउनपासून जळगावी आला होता

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणारा रोहन याने एलएलबीचे शिक्षण केले आहे. कोरोना काळात लागलेल्‍या लॉकडाऊनमुळे तो मुंबईहून जळगावी आला होता. या दरम्‍यान कुटुंबीयांनी त्याला बळीराम पेठ परिसरात साड्यांचे दुकान टाकून दिले होते.

आईने पाहिले अन्‌

आज रविवारी असल्‍याने थोडा निवांत होता. परंतु, सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला व वृत्तपत्र वाचन करून पुन्हा बसला. या दरम्‍यान कुटुंबीय बाहेर गेले असताना त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने रोहनची आई सुनीता या घरी परतल्या. त्‍यांनी रोहनला आवाज दिला. परंतु, त्‍यांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्‍यांनी आतमध्‍ये जावून पाहिले तर त्‍यांना घडलेला प्रकार दिसला व त्‍यांनी हंबरडा फोडला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सोनभद्रच्या खाणीत मोठी दुर्घटना, २ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली १५ जण गाडल्याची भीती

भाजपनं व्होटचोरीतून निवडणूक जिंकली? व्होटशेअरवरुन नव्या चर्चेला उधाण

Passport Service Change : पासपोर्ट सेवेत महत्वाचा बदल, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा, जुन्या पासपोर्टचं काय?

७५ लाख महिलांच्या खात्यावर ₹ १०,०००; रेवडी वाटपावर पवारांचा सवाल, फडणवीसांचे उत्तर, वाचा स्पेशल रिपोर्ट

Shubman Gill Hospitalised: भारताचा कर्णधार शुभमन गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालंय? महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT