St Strike saam tv
महाराष्ट्र

St Strike: जळगाव जिल्‍ह्यातील एसटीचे ३१ कर्मचारी बडतर्फ

जळगाव जिल्‍ह्यातील एसटीचे ३१ कर्मचारी बडतर्फ

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्‍या तीन महिन्‍यांपासून संपावर आहेत. संपातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असून, त्यानंतर बडतर्फीचीही कारवाई करण्यात येत आहे. यात जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यातील तब्बल ३१ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. (jalgaon news st strike news 31 ST employees service stop from Jalgaon district)

राज्‍य परिवहन महामंडळाचे (MSRTC) विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप (St Strike) पुकारला आहे. या संपाला तीन महिने पूर्ण होत आहेत. संपावर तोडगा काढत महामंडळाने वेतनवाढ दिली. परंतु वेतनवाढ मान्‍य नसल्‍याचे सांगत कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे महामंडळाची ८० टक्के सेवा बंद आहे. बससेवा (St Bus) बंद असल्‍याने महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहेत.

आतापर्यंत ४०० कर्मचारी निलंबित

महामंडळाने संपातील कर्मचाऱ्यांवर निलंबनासह बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला निलंबन करून नंतर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. ३१ कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत चाळीसगाव (Chalisgaon) आगाराचे सर्वाधिक १६, यावलचे आठ तर चोपड्याचे ७ कर्मचारी आहेत. दरम्यान बडतर्फीसोबत आतापर्यंत ४०१ कर्मचाऱ्यांवर निलंबन तर जळगाव विभागातील १७२ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली महामंडळातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : घृणास्पद! चॉकलेटचं आमिष दाखवून निर्जनस्थळी नेलं, ४ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

Maharashtra Live News Update: हिंगोलीत पुन्हा पडला गारांचा पाऊस

Face Care: उन्हात होणारी टॅनिंग आणि डलनेस करा कमी; आठवड्यातून २ वेळा वापरा हा होममेड फेस मास्क

Shengdanyachi Barfi Recipe: उपवासाला बनवा मावा न वापरता शेंगदाण्याची बर्फी, तोंडात टाकताच विरघळेल

PNG gas : गॅस सिलिंडरचा तुटवडा असतानाच सरकारचा मोठा निर्णय, पाईपलाइनच्या गॅसबाबत दिले महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT