St Employee Suicide Saam tv
महाराष्ट्र

एसटी चालकाची आत्‍महत्‍या; सुसाईड नोटी लिहून रेल्‍वेखाली दिले झोकून

एसटी चालकाची आत्‍महत्‍या; सुसाईड नोटी लिहून रेल्‍वेखाली दिले झोकून

Rajesh Sonwane

जळगाव : चार महिन्‍यांपासून सुरू असलेल्‍या एसटी कर्मचारी संप अजूनही मिटलेला नाही. या संपाचा एसटीतील आणखी एका कर्मचारीचा बळी गेला आहे. जळगावात हा प्रकार झाला असून चालकाने रेल्वेखाली स्‍वतःला झोकून देत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सकाळी घडली. (jalgaon ST strike driver suicide He wrote a suicide note and bowed down under the train)

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या (MSRTC) जळगाव विभागातील (Jalgaon) यावल आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्‍या शिवाजी पंडित पाटील (वय ४५) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. परिवहन महामंडळातील कर्मचारींच्‍या संपादरम्‍यान (St Strike) आजची आत्‍महत्‍या ही राज्यातील ११४ वी तर जळगाव जिल्ह्यातील तिसरा बळी गेला आहे.

गँगमनच्‍या निदर्शनास आल्‍यानंतर घटना उघड

जळगाव शहरातील शिवाजीनगर स्‍मशानभुमी समोरील खांबा क्रमांक ४२०/२९/अ डाऊन लाईनवर आज सकाळी १० वाजेपुर्वी रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना साडेदहाच्‍या सुमारास गँगमनच्या निदर्शनास आली. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना हे पोहचल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली.

खिशात सुसाईड नोट

मृतदेहाचे खिसे तपासले असता खिशात एक डायरी मिळून आली. डायरीत असलेले ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून मृताची ओळख पटली. माझी मनस्थिती खराब असल्याने मी टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही; असा उल्लेख सुसाईड नोटमध्‍ये केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT