St Strike Saam tv
महाराष्ट्र

St Strike: आणखी एका एसटी चालकाची आत्महत्या

आणखी एका एसटी चालकाची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : एसटीच्‍या रावेर आगारातील बसचालक कन्हैय्या भिका अटकाळे (वय ४७) यांनी राहत्या घरी थेरोळा (ता. रावेर) येथे आत्महत्या केली. याबाबत रावेर पोलिसांत अकस्मात (Raver Police) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news st strike Another ST driver commits suicide raver depot)

रावेर (Raver) आगारात कन्हय्या अटकाळे हे चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी शनिवारी (ता. १२) रात्री उशिरा घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. याबाबत रावेर पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे तपास करत आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

तासाभरापुर्वीच पत्नीने दिली होती तक्रार

अटकाळे एसटीच्या संपात (St Strike) सहभागी होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या पत्नीने ते दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात दिली होती. तक्रार लिहिली जात असतानाच त्यांनी आत्महत्या केल्याचा निरोप पोलिस ठाण्यात पोचला. त्यांचा मुलगा विशाल याने दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT