St Bus Saam tv
महाराष्ट्र

MSRTC Bus News: ‘एसटी’ची सवलत भारी; ५० टक्के सवलतीने वाढले तिप्पट महिला प्रवासी

‘एसटी’ची सवलत भारी; ५० टक्के सवलतीने वाढले तिप्पट महिला प्रवासी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : महिला दिनाच्‍या दिवशी सादर झालेल्‍या अर्थसंकल्‍पात राज्‍य शासनाने सर्व महिलांसाठी (St Bus) बसमधून प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली. याची अंमजलबजावणी सुरू झाल्‍यानंतर लालपरीमधून प्रवास करण्यासाठी महिला प्रवाशांची गर्दी अधिक आहे. ही गर्दी पाच दिवसात (Jalgaon News) तिप्पट महिला प्रवाशांची संख्या वाढली असून, जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाख महिला प्रवाशांनी सवलतीत प्रवास केला आहे. (Breaking Marathi News)

राज्‍य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान योजना' घोषित करून (MSRTC) राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकीटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. त्‍याच दिवसापासून महिला प्रवाशांची एसटीत गर्दी वाढली आहे. अर्थात आता बसमध्‍ये महिला व ज्‍येष्‍ठ नागरीकांचीच गर्दी अधिक पहावयास मिळत आहे.

दिवसगणीक संख्‍या वाढतेय

राज्‍य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बसेसला महिला प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर जळगाव विभागातून पहिल्या दिवशी २१ हजार ९६१ महिला प्रवाशांनी प्रवास केला. यानंतर प्रत्‍येक दिवशी प्रवाशांची संख्‍या वाढत जात आहे. दुसऱ्या दिवशी ६७ हजार १०९, तिसऱ्या दिवशी ६३ हजार ३९४ तर २० मार्चला तब्बल ७३ हजार, २१ मार्चला ८१ हजार व २२ मार्चला ७५ हजार महिलांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT