murder 
महाराष्ट्र

मुलाने केला वडिलांचा खून; जेवणात उडदाची डाळ– भाकरी केल्याचा राग

मुलाने केला वडिलांचा खून; जेवणात उडदाची डाळ– भाकरी केल्याचा राग

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यात खाटेच्या माचल्याचा दांडका डोक्यात मारून खुन केल्याची घटना सोमवारी (ता.२९) सायंकाळी पाल (ता.रावेर) येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी संशयितास अटक केली आहे.

पाल (ता.रावेर) येथे गट शेत शिवार गट नंबर २७१ शेतात अनाज्या भारत्या बारेला (वय ७५) हा रहात होता. सोमवारी सायंकाळी त्यांनी त्यांचा मुलगा दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला (वय २६) यास जेवण करून घेण्यास सांगितले. यावेळी दिनेशने काय केले आहे असे विचारले असता त्याच्या वडीलांनी उडीद दाळ व भाकरी केल्याचे सांगितले.

वडीलांसह बहिणीसही मारहाण

उडीद दाळ व भाकरी केल्‍याचा राग येऊन दिनेशने वडील व बहीणीस चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्याचे वडील तेथून पळून जात असतांना दिनेश याने लाकडी खाटेच्या माचल्याच्या दांडक्याने वडील अनाज्या बारेला यांच्या तोंडावर व डोक्यावर तडाखा मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले. याबाबत बनाबाई नरसिंग बारेला यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन नवले व पोलीस करीत आहेत.

संशयीतास अटक

दरम्यान सदरची घटना समजताच विभागीय पोलीस अधिकारी श्री. लवांडे, सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोलीस निरिक्षक मनोहर जाधव व पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संशयीत दिनेश उर्फ शिवा यास पोलीसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT