Girna Dam Saam tv
महाराष्ट्र

धरणाची चौथ्यांदा ‘शंभरी’; ‘गिरणा’चे सहा दरवाजे उघडले

धरणाची चौथ्यांदा ‘शंभरी’; ‘गिरणा’चे सहा दरवाजे उघडले

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरण (Girna Dam) चौथ्यांदा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून रविवारी (ता. १८) २२ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Jalgaon News Girna Dam)

मागील गुरुवारी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे (Girna River) गिरणा पट्ट्यातील आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. धरण भरल्यामुळे पिलखोड (Jalgaon) येथील गिरणा नदीला पुराचे स्वरूप आले आहे, तर बहाळ येथील ऋषिपंथा मंदिराजवळील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पुलापलीकडील बहाळ व आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस (Rain) सुरू असल्यामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू राहणार आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता हेमंत पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खर्डी – उंबरमळी स्टेशनमध्ये रुळाजवळील कोरड्या गवताला आग

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

SCROLL FOR NEXT