Delta plus 
महाराष्ट्र

जळगाव जिल्‍ह्यातही ‘डेल्‍टा प्‍लस’चे रुग्ण; पण चिंतेचे कारण नाही

जळगाव जिल्‍ह्यातही ‘डेल्‍टा प्‍लस’चे रुग्ण; पण चिंतेचे कारण नाही

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पहिल्या व दुसऱ्या लाटेतही हॉटस्पॉट बनलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटने बाधित आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. असे असले तरी हे सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यापैकी एकालाही ऑक्सिजन लावण्याची गरज भासली नाही. (jalgaon-news-six-Delta-Plus-patients-also-in-Jalgaon-district)

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासूनच जळगाव जिल्हा संसर्गाचा ‘हॉटस्पॉट’ बनला होता. पहिल्या व दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक असलेल्या देशातील निवडक जिल्ह्यांत जळगाव जिल्ह्याचे नाव अग्रभागी होते.

लाट ओसरली, चिंता कायम

या दोन्ही लाटांचा सामना प्रशासन व नागरिकांनी मिळून समर्थपणे केला. आता गेल्या महिन्यापासून दुसरी लाट ओसरू लागली आहे. ती पूर्णपणे ओसरत असताना ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटने बाधित आणखी सहा रुग्ण समोर आले आहेत. याआधीही जिल्ह्यात ‘डेल्टा’ बाधित सात रुग्ण आढळले होते. गेल्या जूनमध्ये पारोळा तालुक्यातील एकाच गावातील हे सात रुग्ण होते. त्यामुळे ‘डेल्टा प्लस’ बाधित आतापर्यंत १३ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.

जळगावसह जामनेरात

सद्य:स्थितीत नव्याने आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’ बाधित रुग्णांमध्ये जळगाव मनपा क्षेत्रातील दोन, जामनेरातील तीन व पारोळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. पारोळा येथील रुग्ण लक्षणेविरहित होता, तर जळगाव व जामनेरातील रुग्णांना सौम्य लक्षणे होती. हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात होते, त्यापैकी कुणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही. सर्वच्या सर्व रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. पैकी पारोळा येथील रुग्णाने कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस बाधित झाल्यानंतर घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

चिंतेचे कारण नाही

विषाणूने जनुकीय रचना बदलत राहणे हा त्या विषाणूचा नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. त्यामुळे ‘डेल्टा प्लस’ बाधित रुग्ण आढळून आले असले तरी नागरिकांनी चिंता न बाळगता कोरोनासंबंधी नियम पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update : मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक आज राहणार 3 तास बंद

ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT