महाराष्ट्र

वॉचमन दाम्पत्यांमुळे चिमुरड्या बहिणी सुरक्षित; रात्रीच्‍या अंधारात फिरत होत्‍या एकट्या

वॉचमन दाम्पत्यांमुळे चिमुरड्या बहिणी सुरक्षीत; रात्रीच्‍या अंधारात फिरत होत्‍या एकट्या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : औद्योगीक वसाहत परीसरात तहान- भुकेने व्याकुळ भटकणार्या देान अल्पवयीन बहीणी एका वाचमन दाम्पत्याच्या नजरेस पडल्या. त्यांनी दोघींना रात्रभर आसरा देत सकाळी पोलिसांना घटना कळवली. एमआयडीसी पोलिसांनी दोघा बहीणींना बालनिरीक्षणगृहात दाखल केले असुन त्यांच्या आई- वडीलांचा शोध सुरु आहे. (jalgaon-news-sisters-safe-due-to-Watchman-couple-Walking-alone-in-the-dark-of-night)

औद्योगिक वसाहत परीसरातील निर्मनुष्य रस्‍त्यांवर पंधरावर्षीय बालिका लहान बहिणीसोबत शनिवार(ता.७) रोजी रात्री आठ वाजेच्‍या सुमारास अन्न- पाण्याच्या शोधार्थ भटकत होत्या. शनिवारी सर्वच कंपन्या बंद असतात परिणामी अधीकच भयावह परिस्थीती असते. रात्रीच्या अंधारात कार चालक जायची हिंमत करत नाही; अशा रस्त्यावर या दोघी बहिणी भटकत होत्या. त्यांच्या मागे काही लोचट पोरं चकरा मारत असतांना सेक्टर ६५ मधील वॉचमन अर्जुन संतोष सोनवणे व त्याची पत्नी अशांच्या लक्षात आले.

त्‍यांना घरात घेवून दिले पोटभर जेवण

श्रीमती सोनवणे यांनी स्वतःहुन या मुलींना बोलावून घेत चौकशी केली. तर त्या काहीएक बोलण्याच्या मनस्थीतीत नव्हत्या. भुक लागल्याचे विचारल्यावर माना डोलवल्याने सोनवणे दाम्पत्यानी इतक्या रात्री देाघींसाठी स्वयंपाक करुन दोघींना पोटभर जेऊ घातले. दिवस उजाडल्यावर सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, अतुल वंजारी यांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत दोघा मुलींना पोलिस ठाण्यात आणून विचारपुस केल्यावर त्यांनी अमरावतीचे असल्याचे सांगीतले. दोघींचा पेालिस ठाण्यात चहा-नाष्टा दुपारचे जेवण होवुन त्यांना बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT