जळगाव : आषाढी एकादशीनंतर लग्नसराई बंद होते. त्याच अनुषंगाने होणारे विविध कार्यक्रमही सध्या नाहीत. यामुळे सोने-चांदीच्या बाजारात सध्या शांतता आहे. महिनाभरात (Silver) चांदीच्या दरात साडेपाच हजारांची, तर (Gold) सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. (Jalgaon News Silver Price Today)
चांदीचा दर २२ जूनला ६२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होतो. बुधवारी (ता. २०) हा दर ५७ हजार प्रतिकिलो होता, तर २२ जूनला सोन्याच्या दहा ग्रॅमचे दर ५१ हजार रुपये होते. बुधवारी ५० हजार ७०० रुपये होते. दहा दिवसांपूर्वी ५९ हजारांचा दर (Jalgaon News) असलेल्या चांदीच्या दरात चक्क दोन हजारांची घसरण होऊन ते ५७ हजार प्रतिकिलोवर स्थिर आहेत.
असे होते दर
अक्षयतृतीयेला चांदीचा दर ६९ हजारांवर (प्रतिकिलो) होता. नंतर थेट चार हजारांची घसरण होऊन चांदी ६५ हजारांपर्यंत आली होती, तर सोन्याच्या दरात एका तोळ्यामागे ३५० रुपयांची घसरण झाली होती. १४ मेस सोन्याचा दर ५० हजार ६०० प्रतितोळा होता. चांदी ६१ हजारांवर होती. २३ मेस सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ होऊन ते ५१ हजार ५०० वर गेले. तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन ६४ हजारांवर गेली. ३० मेस सोने ५१ हजार ७०० रुपये, तर चांदी ६३ हजारांवर गेली. ११ जूनला सोने ५२ हजार, तर चांदीचे दर ६३ हजार ५०० रुपये होते. २० जूनला सोन्याचे दर ५१ हजार, तर चांदीचे ६२ हजार ५०० रुपये होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.