Shiv Sena Sanjay Sawant Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Shiv Sena: धमकी देणाऱ्यांना त्याच पध्दतीने उत्तर देऊ; संजय सावंत यांचा इशारा

धमकी देणाऱ्यांना त्याच पध्दतीने उत्तर देऊ; संजय सावंत यांचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आमच्या कार्यकर्त्यांना कोणी धमक्या देत असेल, तर त्यांचाही त्याच पद्धतीने सामना करू. आमचा जन्म (Shiv Sena) शिवसेनेत झाला असून धमक्या देणे व अन्य ज्या विद्या धमक्या देणाऱ्यांना येतात त्या विद्या त्यांच्यावरच उतरवू; असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिला. (Breaking Marathi News)

जळगाव (Jalgaon) व धरणगाव तालुका युवा सेना व शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील लेवा भवन येथे झाली. यावेळी माध्‍यमांशी संवाद साधतांना सावंत बोलत होते. बैठकीला महापौर जयश्री महाजन, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव शहर महानगर प्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते.

निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवू

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आगामी निवडणूक मविआ म्हणून लढणार. शिवसेना फोडण्याचे ज्यांनी पाप केले. त्यांना मातीत घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच धरणगाव व नशिराबाद नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवू असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer: पनीर खाणाऱ्यांनो सावधान, सरकारने घेतला मोठा निर्णय; हॉटेलवाल्यांवर होणार कारवाई

Adinath Kothare New Project: शिरगावच्या खुनाचं गुंतागुंतीचं कोडं सुटणार का? 1 मे पासून आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर उलगडणार शिरगावचं रहस्य

४ टर्म आमदार राहिलेला भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: आमदार दिपक केसरकर यांची घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT