Gulabrao Patil saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने वर्चस्‍व राखले; गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने वर्चस्‍व राखले; गुलाबराव पाटील

संजय महाजन

जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीत सत्‍तांतर होवून शिवसेनेने विजय प्राप्‍त केला. नगरपंचायतीच्‍या पहिल्‍याच निवडणुकीत शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळाले असून, या विजयामुळे जळगाव जिल्‍ह्यात शिवसेनेने (Shiv Sena) आपले वर्चस्‍व राखल्‍याची भावना पाणीपुरवठा स्वछता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केली आहे. (jalgaon news Shiv Sena dominated district Gulabrao Patil statement in bodwad nagar panchayat election)

बोदवड नगरपंचायतीच्‍या (Bodwad Nagar Panchayat) १७ जागांसाठी झालेल्‍या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. यात शिवसेनेला ९, राष्‍ट्रवादी ७ व भाजपला (BJP) केवळ १ जागा मिळाल्‍या आहेत. यामुळे येथील स्‍थानिक आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्‍या नेतृत्‍वाला बोदवडकरांनी पसंती दिली आहे; तर खडसे यांच्‍या पक्षांतराला नाकारल्‍याचे चित्र आहे.

बोदवडचा नक्‍कीच कायापालट

बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्‍या विजयानंतर पालकमंत्री पाटील म्‍हणाले, की आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाला बोदवडकरांनी पसंती दिली आहे. या निवडणुकीमध्ये नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिल्या वेळेसच शिवसेनाला निर्विवाद बहुमत मिळालेले आहे. यामुळे खात्री आहे, की येत्या काळात बोदवडचे रखडलेले विकास कामे पूर्ण करून बोदवडचा कायापालट करण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT