Khedibhokri Bridge
Khedibhokri Bridge 
महाराष्ट्र

Khedibhokri Bridge: हंगामी खेडीभोकर पूल अद्याप बंदच; नदीपात्रातून वाहनधारकांची कसरत

संजय महाजन

जळगाव : चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी व जळगाव तालुक्यातील भोकर दरम्यानचा तापी नदीवरील हंगामी लाकडी पूल बनविण्यास डिसेंबर महिन्यात सुरूवात होत असते. दरवर्षी १ जानेवारीपासुन रहदारीसाठी सुरू होत असलेला हा हंगामी पुल अद्याप बंदच आहे. (jalgaon news seasonal Khedibhokar bridge is still closed)

खेडीभोकरीचा तापी नदीवरील पुल (Tapi River Bridge) हा दरवर्षी नववर्षाला अर्थात १ जानेवारीला सुरू होवून ३१ मेपर्यंत रहदारीसाठी खुला करण्यात येत असतो. परंतु अजूनही या पुलाचे काम थंडबस्त्यात असल्याने या मार्गाने ये-जा करणारे वाहनधारक, चालक व पादचारी यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. म्हणून हा पूल त्वरीत बनविण्यात यावा; अशी मागणी गोरगावलेचे स्थानिक नागरिकांनी यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

अनेक मार्गाचा शॅार्टकट

पुलावरून चोपडा व्हाया भोकरमार्गे जळगाव (Jalgaon) जाताना वेळ व पैशांची बचत होत असल्याने खानदेशसह मध्यप्रदेश (Madhya Pradesh), गुजरात (Gujrat) राज्यातील खाजगी व सरकारी वाहनधारक चालक याच मार्गाने जाणे पसंत करतात. हा पूल बनवण्यासाठी संबंधित विभागामार्फत दरवर्षी लाखोंचा निधी मंजूर होत असतो. परंतु सालाबादप्रमाणे यावर्षी हा पूल सुरू न झाल्याने तापी नदी काठावरील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने ह्या हंगामी लाकडी पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा तापी नदीपात्रात पंचक्रोशितील ग्रामस्थांतर्फे लवकरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

SCROLL FOR NEXT