Jalgaon Bhusawal Railway Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal: रेल्वेच्या प्‍लॅटफॅार्मवरील स्टॉलवर मद्य विक्री

रेल्वेच्या प्‍लॅटफॅार्मवरील स्टॉलवर मद्य विक्री

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : भुसावळ येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १/२ वरील एका खानपानच्या स्टॉलवर बेकायदेशीरपणे दारू, सिगारेट, तंबाखू, माचिस बॉक्सची विक्री होत असल्याने (Railway) रेल्वेच्या पथकाने छापा टाकून साहित्य जप्त केले. संबंधित स्टॉलचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. (Jalgaon News bhusawal Railway)

भुसावळ (Bhusawal) रेल्‍वे स्‍थानकावरील हा स्टॉल दीपाली चौधरी यांचा आहे. वाणिज्य विभागाला गोपनीय स्रोतांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार स्टॉलवर झडती घेतली असता साहित्य आढळून आले आहे. त्यात इंपीरियल ब्लू अल्कोहोल ८ बाटल्या, देशी (Liquor) दारूच्या बाटल्या १०, चार चौरस सिगारेटची पाकिटे, विमल आणि व्ही १ तंबाखू पॅकचे सहा पाकिटे, साबळे बिडी पॅक २ यांचा समावेश आहे. वरील सर्व वस्तू रेल्वेस्थानक परिसरात तसेच केटरिंग स्टॉलवर विकण्याची परवानगी नसतानाही ती विकण्यात येत होती.

परवाना रद्द

रितसर एफआयआर नोंदविल्यानंतर कंत्राटदाराचा परवाना रद्द केला जाईल आणि पुढील रेल्वे निविदांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल असेही सूत्रांनी सांगितले. आरपीएफ कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक पथकाने छापा टाकताना स्वतः वरिष्ठ मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे, वाणिज्य निरीक्षक - नितीन राठोड, वाणिज्य स्टेशन मॅनेजर मिलिंद साळुंखे, टीटीई धरणगावकर, आरोग्य निरीक्षक धरमवीर, आरपीएफ निरीक्षक मीना, स्टाफ उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

Gold Price Today : आज चांदी स्वस्त! सोन्याचे दर वाढले की घसरले? सुवर्णनगरीतील ताजे भाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT