Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: सरकारमधील प्रत्येकाच्‍या गुडघ्याला बाशिंग; आमदार एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

सरकारमधील प्रत्येकाच्‍या गुडघ्याला बाशिंग; आमदार एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्‍यातील सरकारमधल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे काम सध्या होत आहे. प्रत्येकाला मंत्री व्हायचं आहे. यासाठी प्रत्येकाने गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवलेले आहे; अशी प्रतिक्रीया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली. (Tajya Batmya)

जळगावात (Jalgaon) माध्‍यमांशी संवाद साधताना खडसे बोलत होते. खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले, की राज्‍य सरकारमधील प्रत्येक आमदाराला मंत्री व्हायचे आहे. अब्दुल सत्तार यांनी देखील याविषयी उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे सत्तारांनी ते कार्यकर्ते कोण? हे उघडपणे सांगावे.

सरकार कधीही कोसळू शकते

शिंदे सरकारमध्ये व आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. एकमेकांचे उने दुणे काढत आहेत. अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार यांच्यावरती आहे. निकाल काय येतो यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. अशाच प्रकारची जर अस्वस्थता वाढली; तर हे सरकार कधीही कोसळू शकते; अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : गर्दीपासून दूर, सह्याद्रीच्या कुशीत! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ल्यांवर दिवाळीत भटकंती करा

Maharashtra News Live Update: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT