newborn baby saam tv
महाराष्ट्र

‘नकोशी’ला निर्जनस्थळी सोडून निर्दयी मातेचे पलायन

थंडीच्या दिवसात या पाच दिवसांच्या कोवळ्या बालिकेचा त्याग करणाऱ्या मातेबद्दल तीव्र संताप व्यक्त

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : पाच दिवसांच्या ‘नकोशी’चा अज्ञात मातेने त्याग करून तिला कर्जोद शिवारातील शेतात बेवारस सोडून दिले. ही घटना ५ जानेवारीला दुपारी उघडकीस आली. याबाबत येथील पोलिस (Police) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news raver Leaving a newborn baby in a road)

कर्जोद (ता. रावेर) (Raver) येथील पोलिसपाटील अमोल पाटील यांना बुधवारी दुपारी तीनपूर्वी कर्जोद- अहिरवाडी रस्त्यावर मनोज पाठक यांच्या शेताजवळ एका अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी शेताकडे धाव घेतली असता, एक स्त्रीलिंगी अर्भक (Newborn Baby) आढळले. त्यांनी या अर्भकास पोलिसांच्या माध्यमातून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

बाहेरगावाहून येत रस्‍त्‍यावर टाकले

पोलिसांनी तपास केला असता या नवजात बालिकेची माता परिसरात नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अन्य बाहेरगावाहून अज्ञात व्यक्तींनी नवजात बालिकेला निर्जन रस्त्यावर आणून सोडले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तिच्या मातेचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून, थंडीच्या दिवसात या पाच दिवसांच्या कोवळ्या बालिकेचा त्याग करणाऱ्या मातेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT