Jalgaon NCP Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: मुख्यमंत्र्यांसमोर पन्नास खोके एकदम ओके आंदोलनाचा प्रयत्न; पोलिसांकडून राष्ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांना अटक

मुख्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचा पन्नास खोके एकदम ओके आंदोलनाचा प्रयत्न; पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक

संजय महाजन

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगावात आगमन होण्याआधीच राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी पन्नास खोके...एकदम ओके अशा घोषणा लिहलेले टिशर्ट घालून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी (Police) हे आंदोलन उधळून लावले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. (Jalgaon News NCP Protest)

राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जळगाव जिल्‍ह्यात आले आहेत. त्‍यांचे दुपारी साडेतीनच्‍या सुमारास (Jalgaon) जळगाव विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते पाळधी येथे कार्यक्रमासाठी जात होते. या पुर्वी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडून मुख्‍यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याची तयारी होती. ज्यांनी 50 खोके देऊन आमदार विकत घेतले आहे असा आरोप करत एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आल्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी घेतले ताब्‍यात

राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनाच्‍या तयारीत होते. परंतु, पोलिसांनी आंदोलनापुर्वी कार्यकत्‍र्यांना ताब्‍यात घेतले. कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरिता या आंदोलन करण्यात येणार होते. त्याची माहिती मिळाल्‍याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना अटक करण्यात आल्‍याचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT