कापसाची चोरी 
महाराष्ट्र

कापसाला भाव..शेतातून होतेय कापसाची चोरी

कापसाला भाव..शेतातून होतेय कापसाची चोरी

साम टिव्ही ब्युरो

पाल (जळगाव) : भुरट्या चोरांनी अतिशय धुमाकूळ घातला असून शेतात वेचणी करून ठेवलेले कापसाचे गाठोडे चक्क चोरून गायब करण्याची घटना घडत आहे. (jalgaon-news-Prices-of-cotton-but-farmer-cotton-is-stolen-from-the-fields)

पाल परिसरात काही दिवसांपासून शेतातील हंगाम काढणीच्या कामाला वेग आला आहे. भुईमूग, सोयाबीन, मका, ज्वारी व कापूस काढणीस शेतकरी धावपळ करत असून जेमतेम करून शेतातील हंगाम घरात आणण्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. आधीच सर्वच कामे एकत्र आल्याने मंजूरही मिळणे कठीण झाले असुन त्यात चोरांनी शेतात धुमाकूळ घातला आहे. आधीच शेतातील हंगाम अति पावसामुळे खराब झाले असून यावर्षी शेतात लावलेला खर्च सुध्दा निघणार नसून यात भुरटे चोर सक्रिय झाले असून शेतकऱ्यांचे अतिशय हाल होत आहे

वेचणी केलेला कापुस चोरला

पाल येथील सोहेल शब्बीर अहमद यांच्या शेतात पंधरा मजूर कापूस वेचणीस गेले होते. या मजुरांनी काढलेल्या कापसाची गाठोडे कडुनिंबाच्या झाडाखाली ठेवली होती. मात्र दुपारच्या वेळी अज्ञात चोरांनी चक्क वेचणी केलेला कापुसाचे गाठोडे शेतातुन चोरून नेले आहे. यामुळे शेतकरीचे मोठे नुकसान झाले आहे.

या शेतकऱ्यांच्या शेतीतून गाठोडे चोरी

आठवडाभरापासून शेतातील कापसाचे गाठोडे चोरीच्या घटनेत वाढ होत असून भिमसिंग चतरु चव्हाण, डॉ. शब्बीर शेख, नवलसिंग पिता चव्हाण, अभेराम मैताब पवार आणि प्रमोद भंगाळे यांच्या शेताच्या बांधावर ठेवलेले कापूसाचे गाठोडे रविवारी दुपार एक वाजेच्या सुमारास लंपास करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT