निलंबित 
महाराष्ट्र

कन्नड घाटात वसुली करणारे ते पोलिस कर्मचारी निलंबित

कन्नड घाटात वसुली करणारे ते पोलिस कर्मचारी निलंबित

संजय महाजन

जळगाव : चाळीसगावच्या (Chalisgaon) कन्नड घाटात नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांकडून वसुली करणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी शनिवारी काढले आहेत. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी ट्रक चालकाच्या वेशात या वसुली पोलिसांचा पर्दाफाश केला होता.

अवजड वाहनांना बंदी असताना कन्नड घाटात नाकाबंदी करत प्रत्येक ट्रक चालकांकडून जशी जमेल तशी वसुली करणाऱ्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करून या चौघांचा व्हिडिओ पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांना टाकला हेाता. खातेंतर्गत चौकशी सुरु असून चौघांच्या निलंबनाचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत.

यांचे झाले निलंबन

गणेश वसंत पाटील, प्रकाश भगवान ठाकूर, सतीश नरसिंग राजपूत, संदीप भरत पाटील असे केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. निलंबन काळात चौघे कर्मचारी खासगी नोकरी, व्यवसाय करू शकणार नाहीत, असे आदेशात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT