वटवृक्ष 
महाराष्ट्र

अनोखी ऑक्सिजन बँक..२१ एकरात दीड हजार वटवृक्षांची लागवड

अनोखी ऑक्सिजन बँक..२१ एकरात दीड हजार वटवृक्षांची लागवड

संजय महाजन

जळगावः कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्‍त्‍व सर्वांनाच समजून चुकले आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांचा जीव गेला असल्‍याने ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोठी कसरत करावी लागत होती. परंतु, जळगावात निसर्गाच्‍या सानिध्‍यातील अनोखी अशी ऑक्सिजन बँक उभारली जात असून २१ एकर खाजगी जागेत दीड हजार वडांच्या झाडाच्या लागवडीतून हा पहिलाच प्रकल्प उभारला जात आहे. (jalgaon-news-Planting-of-one-and-a-half-thousand-banyan-trees-in-21-acres)

सुबोनियो केमिकल्स लिमिटेड व मराठी प्रतिष्ठान जळगावतर्फे शहरापासून 15 की.मी. अंतरावर असलेल्या गाडेगावजवळ हा प्रकल्‍प साकारला असून याचा शुभारंभ रविवारी (ता.१९) झाला. यावेळी जिल्‍हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मनपा आयुक्‍त सतीश कुलकर्णी यांच्‍यासह सुबोनियो केमिकल्‍स लि. व मराठी प्रतिष्‍ठानचे पदाधिकार हजर होते.

दीड महिन्‍यांपासून सुरवात

जळगावपासून १५ किमी अंतरावरील खासगी जागेवर हा प्रकल्‍प उभारला जात असला तरी परिसरातील नागरीकांना भविष्‍यात याचा निश्‍चीतच उपयोग होणार आहे. एकवीस एकर जागेत 1500 वडांच्या झाडांच्या लागवडीचा प्रकल्प साकारला जात असून, साधारण महिन्‍यांपासून या प्रकल्‍प उभारणीला सुरवात झाली आहे. निसर्गाच्‍या सानिध्‍यातील ही वटवृक्षांची ऑक्सिजन बँक जळगावकर व परिसरातील नागरीकांनासाठी संजीवनी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

SCROLL FOR NEXT