महाराष्ट्र

निर्दयीपणा की आणखी काही..घराच्या छतावर कमरेपासून पाय तुटलेले मृत अर्भक

निर्दयीपणा की आणखी काही..घराच्या छतावर कमरेपासून पाय तुटलेले मृत अर्भक

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात कंमरेपासून भाग तुटलेल्या अवस्थेत नवजात अर्भक मृत स्थितीत आढळून आले. शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात राहणारे इबा शेख यांच्या घरातील महिला सकाळी दहाच्‍या सुमारास कपडे वाळविण्यासाठी छतावर गेले. त्‍यावेळी त्यांना कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पारोळा शहरात खळबळ उडाली आहे.

निर्दयीपणाचा कळस

बालक कोणाचे आहे याचा काहीही तपास नसताना घराच्या छतावर कुणी आणून टाकले? कमरे खालचे शरीर छतावर आणून टाकण्यापुर्वी तुटलेले होते की छतावर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले? नवजात अर्भकाला अशा विचित्र पध्दतीने छतावर टाकून देणारे निर्दयी लोक कोण असावेत? असे अनेक प्रश्‍न सर्वांनाच निर्माण होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Awareness : चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर पाणी शिंपडणे पडू शकतं महागात, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Naag or Naagin : नाग की नागीण? कसं ओळखाल?

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

Baramati : बारामतीत भीषण दुर्घटना! विहिरीच्या खोदकामावेळी दडी कोसळून 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT