tiger 
महाराष्ट्र

बारा वर्षीय बालकाची झुंज..बकरीवर हल्‍ल्‍यानंतर वाघाची मुलावर झडप

बारा वर्षीय बालकाची झुंज..बकरीवर हल्‍ल्‍यानंतर वाघाची मुलावर झडप

साम टिव्ही ब्युरो

पाल (ता. रावेर) : पालपासून बारा किमी अंतरावरील असलेल्‍या वन हद्दीत शेळी चारण्यास गेलेल्या बारा वर्षीय बालकावर वाघाने हल्ला केला. यात तो बालक गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी पाल वन्यजीव वन हद्दीतील कंपार्टमेंट नंबर ६१ मध्ये घडली.

मांजल येथील गुराखी दीपला माल्या बारेला (वय १०) हा मित्रासोबत दररोजप्रमाणे शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीत मोढ्याचार जंगलात गेले होते. दरम्‍यान दबा धरून बसलेल्‍या वाघाने आधी शेळीवर हल्ला चढवला. नंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करत नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले.

सोबतच्‍या बालकाची गावाकडे धाव

प्रकारानंतर सोबतच्या गुराख्यानी बघताच गावाकडे धाव घेत गावात जाऊन गावकऱ्यांना घडलेली घटनेबाबत सांगून बोलवून आणले. तोपर्यंत अतिशय जखमी करून वाघ पसार झाला होता. वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी केले.

वडीलांनी बुटमध्ये आणून पाणी पाजले

दिपला बारेला याच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. यावेळी त्याला पाणी पाजण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने वडील माल्या बारेला यांनी स्वतःच्या बुटात नाल्यातून पाणी आणून पाजले. यानंतर मुलाला जखमी अवस्थेत दुचाकीवर १२ किलोमोटर पाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

SCROLL FOR NEXT