cannabis  Saam tv
महाराष्ट्र

अंमली पदार्थाची तस्करी; तेलंगणाच्या महिलेकडून एक लाखाचा गांजा जप्त

अंमली पदार्थाची तस्करी; तेलंगणाच्या महिलेकडून एक लाखाचा गांजा जप्त

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मध्यप्रदेशातून गांजा या अंमली पदार्थाची प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून तस्करी करून घेऊन जाणाऱ्या तेलंगणा येथील महिलेला ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. संबंधित महिलेकडून पोलिसांनी गांजासह एक लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. महिलेला चोपडा (Chopda) येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महिलेला दोन दिवसाची पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे. (jalgaon news One lakh cannabis seized from Telangana woman)

चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वैजापूर रस्त्यावरील बोरअजंटी येथील वनविभागाच्या (Forest Department) नाक्याजवळ पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांनी नाकाबंदी केली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला अडवून प्रवाशांची चौकशी केली असता रंजना गंगाधर तिडके (रा. गुडेहतनूर ता. जि. आदिलाबाद, तेलंगणा) येथील महिलेजवळ असलेल्या गोल्ड स्वीट सुपारीच्या पिशवीत लपविलेला ५ किलो १०० ग्रॅम वजनाचा हिरवा सुका गांजा सापडून आला. या अंमली पदार्थाची तस्करी करतांना आढळून आल्याने पोलिसांनी सदर महिलेला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT