Jalgaon News saam tv
महाराष्ट्र

रात्रीस खेळ चाले..खासदारांबद्दल मध्यरात्री रेखाटला आक्षेपार्ह मजकूर

रात्रीस खेळ चाले..खासदारांबद्दल मध्यरात्री रेखाटला आक्षेपार्ह मजकूर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पालकमंत्र्यांच्या पाळधी येथील निवासस्थानासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री निषेधाची रांगोळी काढल्यानंतर वातावरण तापले होते. त्यातच आता मंगळवारी रात्री आमदार सुरेश भोळेंच्या (Suresh Bhole) निवास व कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तींनी खासदार उन्मेश पाटलांबद्दल (Unmesh Patil) आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (jalgaon news Offensive text about mp unmesh patil of the night)

जिल्‍ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या निवासस्थानासमोर दोन दिवसांपूर्वी पाळधी येथे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाचा निषेध म्हणून रांगोळी काढून घोषणाबाजी केली होती. युवासेना व शिवसेनेने त्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून त्यामुळे सेना व भाजपतील (BJP) वातावरण तापले आहे.

त्‍या मजकूराने तणाव

जळगाव (Jalgaon) शहरात अज्ञात व्यक्तींनी आमदार सुरेश भोळे यांच्या रिंगरोड येथील घराबाहेर व क्रीडा संकुलासमोरील कार्यालयाबाहेर भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवल्याने तणाव निर्माण झाला आहे.

भाजपची कारवाईची मागणी

भाजपने या प्रकाराचा निषेध केला आहे. रात्री बाराला टाटा हॅरिअर या चारचाकी वाहनातून येऊन चार अज्ञात महिला व चार पुरुषांनी या ठिकाणी गलिच्छ आणि शिवराळ भाषेत रांगोळीने लिखाण केले आहे. लिखाणातून खासदार उन्मेश पाटील व आमदार भोळे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. अशा अज्ञात समाजकटंकांविरुद्ध गंभीर कारवाई करून सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT