suicide 
महाराष्ट्र

धक्‍कादायक..मध्‍यरात्री ‘बाय’चे स्‍टेटस ठेवत प्रेमी युगलाची आत्‍महत्‍या

धक्‍कादायक..मध्‍यरात्री ‘बाय’चे स्‍टेटस ठेवत प्रेमी युगलाची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : वाडे (ता. भडगाव) येथील माध्‍यमिक विद्यालयाच्‍या ओट्यावरील छताला एका प्रेमी युगलाने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाने मध्‍यरात्री मोबाईलवर बायचे स्‍टेटस ठेवून गळफास घेतला. सदर घटना सकाळी उघडकीस आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-night-bye-status-and-love-couple-suicide-school-aria)

वाडे येथील माध्यमिक विद्यालयात रात्री एक तरूण आणि तरूणीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे प्रेमी युगल असून विवाहाला समाज मान्यता देणार नाही; या भितीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. माध्यमिक विद्यालयातील पहिल्या मजल्यावर जिन्यावर जाऊन गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मुकेश कैलास सोनवणे (वय २२, रा. वाडे, ता. भडगाव) आणि तरूणी ही नेहा बापू ठाकरे (वय १९, रा. वाडे) असे या प्रेमी युगूलाचे नाव आहे.

दोघेही एकाच समाजाचे

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह भडगाव पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा यातील तरूण हा मुकेश सोनवणे आणि तरूणी नेहा ठाकरे असल्याचे समजले. हे दोन्ही एकाच समाजाचे असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही जणांचे मृतदेह खाली उतरवून त्यांच्या पार्थिवाला शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. प्रकरणी पोलीस पाटील अरविंद फकीरा पाटील यांच्या खबरीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय सुशील सोनवणे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

आमच्या जवळच्या लोकांवर चौकशा का? जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT