st bus  
महाराष्ट्र

त्‍या नवीन चालकांनी सोडले स्टिअरिंग; भितीच्‍या वातावरणात आलेच नाही

त्‍या नवीन चालकांनी सोडले स्टिअरिंग

Rajesh Sonwane

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी बेमुदत संपावर असल्‍याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्‍त करत बससेवा सुरू केली. मात्र बसवर झालेल्‍या दगडफेकीने नवीन चालकांनी देखील एसटीचे स्टिअरिंग सोडून दिले. यामुळे आज दिवसभरात एकदेखील बस बाहेर पडली नाही. (jalgaon-news-new-bus-driver-left-the-steering-wheel)

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी पंधरा दिवसांपासून संपावर आहे. यामुळे बससेवा थांबलेली आहे. परंतु, बससेवा सुरळीत करण्यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्‍या उमेदवारांना संधी देखील रविवारी पोलिस बंदोबस्‍तात सेवा सुरू केली. मात्र ही सेवा दुसऱ्या दिवशी कोलमडली आहे.

दहशतीने ते चालक आलेच नाही

बससेवा सुरळीत करण्याच्‍या हेतूने भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असलेल्‍या उमेदवारांना महिनाभराची तात्‍पुरती नियुक्‍ती देत सेवा सुरू केली. मात्र जळगाव बसस्थानकातून सोडलेली धुळे बस एरंडोल येथे अडवून परत पाठविली. तर चोपडा मार्गस्‍थ झालेल्‍या बसवर ममुराबाद येथे अज्ञातानी दगडफेक केली. यामुळे नवीन नियुक्‍त झालेल्‍या चालकांमध्‍ये भिती निर्माण झाली. या भीतीपोटी ते चालक आज ड्युटीवर आलेच नाही. यामुळे बससेवा थांबली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney disease diet: डाएटच्या नावाखाली आहारातील 5 पदार्थ किडनीला आतून पोखरतायत; आजच खाणं बंद करा!

Maharashtra News Live Update: पुण्याला नवीन मेडिकल कॉलेज मिळालं - देवेंद्र फडणवीस

UP Elections: विधानसभाआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; हायकोर्टाचे 3 महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश

IAS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! २३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ११ जिल्ह्यांना मिळाले नवे कलेक्टर

Breast cancer: कोणत्याही प्रकारची वेदना न होणंही धोक्याचं; ब्रेस्ट कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच!

SCROLL FOR NEXT