Jalgaon Nashirabad Toll Plaza Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: बनावट पावत्यांद्वारे टोलटॅक्स वसुली; नशिराबाद नाक्यावर पथकाचा छापा

बनावट पावत्यांद्वारे टोलटॅक्स वसुली; नशिराबाद नाक्यावर पथकाचा छापा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुंबई- नागपूर महामार्गावर जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे टोलनाक्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पथकाने गुरुवारी (ता. २१) रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत (Jalgaon News) टोलनाक्यावर कारवाई सुरू होती. (Jalgaon Today News)

मुंबई- नागपूर (Nagpur) राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद गावाजवळ टोलनाका उभारण्यात आला आहे. नुकतेच या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले असून, (Nashirabad Toll Plaza) नशिराबाद नाक्यावर बोगस बनावट पावत्यांच्या आधारावर वाहनधारकांकडून टोलटॅक्स वसूल करण्यात येत होता. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हा पोलिस (Police) अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात तक्रार केलेली होती.

पथकाचा रात्री अचानक छापा

तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. २१) रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक छापा टाकला. पथकाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बनावट आणि नकली पावत्या आढळून आल्याचे पोलिस दलाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणात संपूर्ण चौकशी झाल्यानंतर रात्री उशिरा नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT