Jalgaon News Satyajit Tambe Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: तांबेच्‍या प्रचार सभेत कॉंग्रेस उपाध्‍यक्षांची कन्‍या

तांबेच्‍या प्रचार सभेत कॉंग्रेस उपाध्‍यक्षांची कन्‍या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवारी करत असलेले सत्‍यजित तांबे यांची जळगावात (Jalgaon News) प्रचार सभा झाली. कॉंग्रेसशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करत असलेल्‍या सत्‍यजित तांबे यांच्‍या प्रचार सभेला (Congress) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची कन्या डॉ. केतकी पाटील या व्यासपीठावर होत्‍या. या प्रकारामुळे चर्चांना उधान आले आहे. (Maharashtra News)

नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यानंतर काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे व सत्यजीत तांबे यांचे पक्षातून निलंबन केले आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला.

सत्यजित तांबे हे जळगाव जिल्ह्यात प्रचार करीत आहेत. त्यांनी जळगावात घेतलेल्‍या मेळाव्‍याच्‍या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील व्यासपीठावर होत्या. विशेष म्‍हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या गेल्‍या आठवड्यात डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. आता डॉ. पाटील यांच्या कन्या तांबे यांच्या व्यसपीठावर असल्‍याने याबाबत चर्चांना उधान आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यातील बुधवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई

CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSC विरोधात CJP आंदोलन उभारणार?

Sugarcane juice: उसाचा रस प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT