Jalgaon News Muktainagar Saam tv
महाराष्ट्र

Muktainagar: निवड होण्याच्‍या काही क्षणापुर्वीच नगराध्यक्ष निवडीला स्थगिती

निवड होण्याच्‍या काही क्षणापुर्वीच नगराध्यक्ष निवडीला स्थगिती

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुक्‍ताईनगरात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्‍व राहिले आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर येथे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) निवडून आले. यामुळे खडसेंच्‍या (Eknath Khadse) बालेकिल्‍ल्‍याला धक्‍का बसला होता. यानंतर आघाडीतून बाहेर पडत शिंदे गटात असलेले चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्ती नगराध्‍यक्ष निश्‍चीत झाले होते. मात्र निवडीच्‍या काही क्षणापुर्वीच या प्रक्रीयेला स्‍थगिती आली आहे. (Jalgaon Muktainagar Today News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर (Muktainagar) नगरपालिकेत शिंदे गटाचा नगराध्यक्ष होणार असल्याने या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होती. मात्र आयत्यावेळी उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्याने या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे.

अखेरच्‍या क्षणी फिरला डाव

मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष पदासाठी पियुष मोरे (महाजन) यांचा एकमेव अर्ज होता. त्यांची निवड बिनविरोध निश्चित मानली जात होती. आजच्‍या निवड प्रक्रियेनंतर अधिकृत घोषणा केली जाणार होती. मात्र निवडीची प्रक्रिया सुरू होऊन नगराध्यक्ष पदाची घोषणा होणार असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे निवड प्रक्रिया स्थगितीचे आदेश प्राप्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik BJP Leader Case: ‘मामा राजवाडे’च्या टोळीचा माज खल्लास! भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

'त्यांनी माझा हात पकडून मला..', गोविंदाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा; नेमकं काय म्हणाली?

Box office collection: 'कंतारा चॅप्टर १' ने रविवारी केली बंपर कमाई; 'सनी संस्कार...'निघाला फुसका बार

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Tea drinking habit: चहाचे शौकीन असाल तर 'ही' चूक अजिबात करू नका; कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधकांचं मत

SCROLL FOR NEXT