Suicide Saam tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक..आईची पाच वर्षीय मुलासह आत्‍महत्‍या

हृदयद्रावक..आईची पाच वर्षीय मुलासह आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : शिरूड (ता. अमळनेर) येथील एका महिलेने पाच वर्षांच्या मुलासह गळफास घेऊन जीवन संपविले. सदर घटना १७ जूनच्या मध्यरात्रीनंतर घडली असून आज सकाळी ही (Jalgaon News) घटना उघडकीस आली. (jalgaon news Mother commits suicide with five year old child)

शिरूड येथील पूर्वी वसंतराव पाटील असे विवाहितेचे तर वृषांत दीपक पाटील उर्फ बिट्टू असे मुलाचे नाव आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी या महिलेचा विवाह झाला होता. परंतु सदर महिला काही वर्षांपासून शिरूड येथे माहेरी आपल्या आई– वडिलांसोबत राहत होती.

लिहून ठेवली सुसाईड नोट

महिलेने आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्‍ये आपल्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये; आम्ही दोघे मायलेक जीवन संपवत आहोत. नंदुरबार येथील सासरच्या मंडळीला बोलावू नका; असेही चिट्ठीत लिहिले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्‍यात घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kheer Recipe: नवऱ्याचं तोंड करा गोड, घरीच बनवा रव्याची खीर

Maharashtra Live News Update: बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप..

Mumbai Metro - 2B : मुहूर्त ठरला! 'मुंबई मेट्रो -२ ब' या दिवशी धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Bhudargar Fort History: कोल्हापूरातील ऐतिहासिक भुदरगड किल्ला माहितेय का? जाणून घ्या इतिहास आणि पर्यटकांसाठी टिप्स

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT