jalgaon shiv sena 
महाराष्ट्र

पारोळ्यात जाळला आमदार राणेंचा पुतळा; गुन्‍हा दाखल करण्याची मागणी

पारोळ्यात जाळला आमदार राणेंचा पुतळा; गुन्‍हा दाखल करण्याची मागणी

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्‍याविषयी आमदार नितेश राणे यांनी अपशब्द वापरले. याचा जळगाव जिल्हा व पारोळा तालुका शिवसेनेतर्फे निषेध करत पारोळा पोलिसात आमदार राणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी करून पारोळा पोलिसात पदाधिकाऱ्यांसह निवेदन देण्यात आले. (jalgaon-news-MLA-nitesh-Rane-statue-burnt-in-Parola-shiv-sena-Demand-for-filing-a-case)

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्‍याबद्दल अपशब्‍द वापरल्‍याचा जिल्‍ह्यात तिव्र निषेध केला जात आहे. यात पारोळा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांना जळगाव जिल्हा शिवसेना व पारोळा तालुका शिवसेनेतर्फे निवेदन देऊन आमदार नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, आबा महाजन, सावण शिंपी, माजी नगरसेवक राजू कासार, तालुका समन्वयक युवासेना चेतन पाटील, समाधान मगर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, किरण पाटील, अमोल पाटील, जगदीश पाटील, सतीश पाटील, अशोक कापडणे, राजू जावरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महामार्गावर आमदार राणेंचा पुतळा जाळून निषेध

जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक निषेध व्यक्त करत असून महामार्गावर आमदार नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत आमदार राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT