Mangesh Chavan Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: खडसेंच्‍या बालेकिल्‍ल्‍यातून विजय; आमदार मंगेश चव्हाण दूध संघाच्या अध्यक्षपदी

खडसेंच्‍या बालेकिल्‍ल्‍यातून विजय; आमदार मंगेश चव्हाण दूध संघाच्या अध्यक्षपदी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. (Live Marathi News)

जळगाव (Jalgaon) जिल्‍हा दूध संघाची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत (BJP) भाजपच्‍या पॅनलने सहज सत्‍ता काबिज केली. अर्थात यात एकनाथ खडसे यांचा बालेकिल्‍ला असलेल्‍या मुक्‍ताईनगरमधून भाजपचे आमदार मंगेश चव्‍हाण यांनी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांचा पराभव करत विजय मिळविला. यानंतर आमदार चव्‍हाण यांचीच चेअरमन पदावर निवड करण्यात आली आहे.

खडसेंचा फोटो काढला

दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोटो काढल्यासंदर्भात पत्रकारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना विचारणा केली असता, मला कळत नाही अध्यक्षाच्या केबिनमध्ये खडसे यांचा फोटो कसा काय लागू शकतो. जिवंतपणी एखाद्या व्यक्तीचा फोटो कसा लावता येतो? प्रोटोकॉल असेल तर आपण एखाद्या व्यक्तीचा लावू शकतो. पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच मुख्यमंत्री यांचे फोटो लावता येतात. पण व्यक्तीचा फोटो लावता येत नाही. म्हणून निवडून आलेल्या सर्व संचालकांनी खडसेंचा फोटो खाली घेण्याची विनंती केली. त्यानुसार शिपायाच्या मार्फत आम्ही तो फोटो काढायला लावला, असे गिरीश महाजन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT