Chimanrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: जागृत संचालकांच्या हाती सत्ता द्या; आमदार चिमणराव पाटील

जागृत संचालकांच्या हाती सत्ता द्या; आमदार चिमणराव पाटील

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : शेतकऱ्यांच्या विकासाला तडा देणाऱ्या असुरी वृत्तींच्या लोकांकडे दूध संघ गेला, तर शेतकऱ्यांचे (Farmer) निश्चितच नुकसान होईल. म्हणून या दूध संघाचे नेतृत्व अनुभवी व जागृत संचालकांकडे द्या; असे आवाहन दूध संघाचे उमेदवार तथा (MLA Chimanrao Patil) आमदार चिमणराव पाटील यांनी केले. (Letest Marathi News)

पारोळा (Parola) येथे दूध संघाच्या सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यापूर्वी पहिला मेळावा चाळीसगाव (Chalisgaon) येथे घेण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगून जनता हुशार आहे, योग्य व्यक्तींच्या हाती संघाची सत्ता देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करून मेळाव्यास सुरुवात झाली. मेळाव्‍याला यावल, रावेर, बोदवड, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर व चोपडा येथील उमेदवार उपस्थित होते.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले, की आपण एक दिवसाचा मुख्यमंत्री बघितला. मात्र आम्ही ३२ दिवसाचे दूध संघाचे सेवक आहोत. आता आमदार चिमणराव पाटील यांचे ४४ वर्षे व आमचे ३२ दिवस असा या शेतकरी विकास पॅनलचा ४४ वर्षे ३२ दिवसांचा प्रदीर्घ अनुभव असलेला जागृत उमेदवारांचा गट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मानेला नख लावणाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT