महाराष्ट्र

महिला आगार प्रमुखाशी गैरवर्तवणुक; अमळनेर आगारातील चार वाहक निलंबित

महिला आगार प्रमुखाशी गैरवर्तवणुक; अमळनेर आगारातील चार वाहक निलंबित

Rajesh Sonwane

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपादरम्यान एसटीच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तणुक केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अमळनेर आगारातील चार कर्मचारी निलंबित करण्यात आले. (jalgaon-news-Misbehavior-with-female-depot-head-Four-employee-in-Amalner-depot-suspended)

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनकरण ही कामगारांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी संपाची तीव्रता अधिक वाढल्याने परिवहन विभागाने संपकऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला. एसटी कर्मचारी संपावर आहेत. यात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निर्देशानुसार राज्यभरात कारवाईचे सत्र सुरु आहे. राज्यातील साडेतीनशे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आगार प्रमुखाशी गैरवर्तवणुक भोवली

अमळनेर आगारात संपादरम्यान संपात सहभागी व्हा; असा आग्रह धरीत गळ्यात हार टाकत महिला आगार प्रमुखाशी गैरवर्तवणुक केल्याचा प्रकार सोमवारी घडला. या तक्रारीनुसार विभाग नियंत्रकांनी अमळनेर आगारातील योगेश छगन घोडके, शीतल माणिक पाटील, प्रवीण साहेबराव मिस्तरी व किरण पाटील या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT