Jalgaon News Measles Saam tv
महाराष्ट्र

Measles: जळगावातही गोवरची साथ; शहरात आढळले ११ रुग्ण

जळगावातही गोवरची साथ; शहरात आढळले ११ रुग्ण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्यात असलेली गोवरची साथ आता जळगाव शहरातही आली आहे. शहरातील एका भागात तब्बल अकरा रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या दवाखाना विभागाचे (Health Department) वैद्यकीय अधिकारी डॉ. राम लावलाणी यांनी दिली. मात्र, या रुग्णांची प्रकृती चांगली असून, उपचारानंतर ते घरीच आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (Maharashtra News)

जळगाव (Jalgaon) महापालिकेत नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार यांनी बुधवारी (ता. ३०) महापालिका (Jalgaon Corporation) दवाखाना विभागाची बैठक घेत गोवर साथीबाबत जळगावातील स्थितीची माहिती त्यांनी घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले, की शहरात गोवरच अकरा रुग्ण आढळले आहेत. ज्या भागात लसीकरणाला नकार देण्यात येतो, त्या भागातील हे रुग्ण आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागात आरोग्‍य विभागातर्फे सर्व्हे सुरू आहे.

ज्या मुलांना गोवरची लस दिलेली नाही, त्या मुलांना गोवरची लस महापालिका वैद्यकीय विभागातर्फे देण्यात येत आहे. काही भागात नागरिक लसीकरण करण्यास नकार देत आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. लसीकरण झालेल्या मुलांना अधिकचा डोस देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून आदेश येईल. त्यानुसार ते लसीकरण करण्यात येईल.

- डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका, जळगाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT