Manudevi Temple, Manudevi Waterfall, Satpuda Waterfall, Jalgaon News, Satpuda Manudevi Temple Saam Tv
महाराष्ट्र

पर्यटकांसाठी पर्वणी..सातपुड्यातील मनुदेवीचा धबधबा सुरू

पर्यटकांसाठी पर्वणी..सातपुड्यातील मनुदेवीचा धबधबा सुरू

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : यावल तालुक्यात गेल्या दोन- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सातपुडा परीसरातील मनुदेवीचा दुधाळ धबधबा सुरू झाला आहे. पर्यटकांची धबधबा (WaterFall) पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे. (Manudevi Waterfall, Jalgaon News)

यावल (Yawal) तालुक्यातील सातपुडा जंगलात श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर आहे. या मंदिरासमोर अंदाजे ४० फुट उंच असा धबधबा आहे. चिंचोलीपासून उत्तरेला दहा ते बारा किमी अंतरावर मनुदेवीचे स्थान असून पावसाळ्यात (Rain) या ठिकाणी हजारो पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. सातपुडा पर्वताने जणू काही हिरवा शालू प्रदान करीत असल्याचे चित्र सध्या परीसरात दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसांत धबधबा वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या पावसात कोसळणाऱ्या या धबधबात (Jalgaon News) डोंगरावरून पाण्याबरोबर लहान मोठे दगडगोटे कोसळण्याची शक्यता असते.

पहिल्‍या पावसातील धबधबा धोकादायक

तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागात व सातपुड्याच्या परीसरात मुसळधार पाऊस झाल्याने मनुदेवी मंदिरासमोरील धबधबा पहिल्याच पावसात सुरू झाला आहे. पहिल्या पावसात सुरू होणारा धबधबा मोठा धोकादायक असल्याने यात जंगलातील कचरा, घाण, लाकडाचे ओंडके वगैरे दगड गोटे येत असल्याने कोणीही धबधबा कडे जाऊ नये; असे आवाहन मनुदेवी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. धबधबा सुरू झाल्यानंतर लगेच कोठवाय नदीलाही पुर आला होता. हे सर्व पाणी मनुदेवी परीसरात असलेले तलावात जमा होत असुन यामुळे आडगाव, कासारखेडा, चिंचोली परीसरात शेतकरी बांधवांना मोठा फायदा होतो. (Satpuda Manudevi Temple)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT