Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: मेहुणीला सोडायला आलेल्या इसमाचा बसस्‍थानकात दोन बसमध्ये दबून मृत्यू

मेहुणीला सोडायला आलेल्या इसमाचा बसस्‍थानकात दोन बसमध्ये दाबून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नवीन बसस्थानकात दोन बसमध्ये दाबले जाऊन जखमी झालेल्या गृहस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना बुधवारी (१२ ऑक्‍टोंबर) घडली. रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिस (Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Letest Marathi News)

खेडी-कढोली (Jalgaon) येथे शेतकरी पंडित लोटू सोनवणे (वय ५०) पत्नी, मुलगा व कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी भारती यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना ११ ऑक्‍टोंबरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Medical Collage) दाखल करण्यात आले होते. भारती यांची बहीण त्यांना रुग्णालयात पाहण्यासाठी आल्या होत्या. मेहुणीला बसमध्ये बसवून देण्यासाठी पंडित सोनवणे नवीन बसस्थानकावर गेले.

दोन बसमध्‍ये दाबले गेले

सायंकाळी पाचच्या सुमारास मेहुणीला बसमध्ये बसविल्यानंतर पायी जात असताना ते मागून आलेल्या बस (एमएच २०, बीएल २४२१) आणि (एमएच ४०, एन ९१०६) या दोन बसमध्ये दाबले गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT