Sugar Factory Saam tv
महाराष्ट्र

जप्‍तीच्‍या नोटीसनंतर मधुकर साखर कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात

जप्‍तीच्‍या नोटीसनंतर मधुकर साखर कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : यावल– रावेर तालुक्याचा आर्थिक कणा असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना 57 कोटीच्या थकबाकी पोटी जिल्हा बँकेने सोमवारी ताब्यात घेतला आहे. तत्पूर्वी दोन महिने आधी जिल्हा बँकेने (JDCC Bank) सिक्युरिटायजेशन ॲक्ट अंतर्गत कारखान्याची मालमत्ता जप्तीची नोटीस दिली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (jalgaon news Madhukar Sugar Factory in the possession of District Bank after confiscation notice)

मधुकर साखर कारखाना (Sugar Factory) गेल्या दोन वर्षापासून बंद होता. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्तावही समोर आला होता. यासाठी दोन वेळा प्रक्रिया राबवूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. या दरम्यान सर्व प्रतिनिधींनी आजी व माजी संचालकांनी संयुक्त बैठक घेऊन जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई स्थगित ठेवावी; अशी एकमुखी मागणी जिल्हा बँकेकडे केली होती. मात्र त्या मागणीत (Jalgaon News) काही उपयोग झाला नाही.

दोन महिन्‍यांपुर्वी नोटीस

नोटीस दिल्‍याप्रमाणे दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होताच सोमवारी (ता.25) सायंकाळी पाच वाजता जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, महाव्यवस्थापक एम. टी.चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखान्याची मालमत्ता सील करत जप्तीची कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT