Gold Market 
महाराष्ट्र

सोन्‍याचे दर कमी; साधला जातोय धनत्रयोदशीचा मुहूर्त

सोन्‍याचे दर कमी; साधला जातोय धनत्रयोदशीचा मुहूर्त

संजय महाजन

जळगाव : धनत्रयोदशी, दिवाळीतील एक महत्वाचा दिवस व साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आजच्या दिवशी सोने खरेदीला महत्व असते. त्‍यात यंदा सोन्‍याचे दर देखील कमी झाल्याने आज जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. (jalgaon-news-Low-gold-prices-The-moment-of-Dhantrayodashi-is-being-celebrated)

दिवाळीतील धनत्रयोदयाशी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने सोने खरेदीसाठी हा महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. आजच्या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर भरभराट व प्रगती होते; अशी मान्यता असल्याने आजच्या दिवशी ग्राहक मोठ्या संख्येने सोने खरेदी करतात. यामध्ये विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने, लक्ष्मीचे शिक्के, सोन्याचे कॉईन खरेदी करण्याची परंपरा असल्‍याने ग्राहक मोठ्या संख्येने सोन्याची खरेदी करताना दिसून आले.

दुष्‍काळी स्थिती परंतु खरेदी चांगली

सोने खरेदीसाठी जळगावातील सुवर्णनगरी प्रसिद्ध असल्‍याने व त्यातच आजचा दिवस सोने खरेदीसाठी शुभ मानला जात असल्‍याने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. यंदा ओला दुष्काळी स्थिती निर्माण झालीय, मात्र सोन्याचे दर स्थिर असल्‍याने आज काही प्रमाणात का होईना ग्राहक सोने खरेदी करताना दिसून आले. तर आज दिवसभरातही सोन्याची विक्री चांगली होईल अशी अपेक्षा सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केली.

गतवर्षीपेक्षा दर कमी

सराफ बाजारात नेहमी चढउतार पाहण्यास मिळत असतात. सोन्‍याचे दर सातत्‍याने वाढत असतात. यंदा मात्र चित्र उलटे असून सोन्‍याचे दर कमी झाले आहेत. याउलट गतवर्षी जळगाव सुवर्णबाजारात सोन्‍याचे दर ५१ हजाराच्‍या वर पोहचले होते. यंदा मात्र ते खाली आले असून ४८ हजार ५०० रूपयांपर्यंत आले आहेत. यामुळे खरेदीचा मुहूर्त साधला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT