Gulabrao Patil Eknath Khadse saam tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्रीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्‍याने पदे मिळविली अन्‌ भोगली; गुलाबरावांची खडसेंवर टीका

मुख्यमंत्रीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्‍याने पदे मिळविली अन्‌ भोगली; गुलाबरावांची खडसेंवर टीका

संजय महाजन

जळगाव : मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणार्‍या खानदेशाच्या नेत्याने लोककलावंत असो, की इतर समस्या याकडे दुर्लक्ष करत नुसतीच पदे मिळवली अन् पदे भोगली. मी मुख्यमंत्री झालो नाही; एवढंच बोलायचे स्वत:च्या पुढे मागे दोन गाड्या फिरवायच्या. मंत्री म्हणून मिरवायचं, एवढेच काम या लोकांनी केले; असा घणाघात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला. (jalgaon leader from Jalgaon got positions and suffered Gulabrao Patil target on Khadse)

जळगावात (Jalgaon) आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर टीका केली. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन (Girish Mahajan) व एकनाथराव खडसे (Eknath Khadse) असे दोन डाकू आहेत, असे मी बोललो होतो. डाकू म्हणजे बंदुका घेऊन निघालेले डाकू नाही. नाक खाजे अन् नक्टी खिजे. यांना दुसरा धंदा काय? असा सवाल करत गुलाबरावांनी निशाणा साधला.

गुलाबरावांचा खडसेंवर निशाणा

जे लोक आमच्यावर बोलतात त्या लोकांना माझे हेच सांगणे आहे की, मी पालकमंत्री म्हणून शाळा कवच व जिल्ह्यात सातशे गावांपेक्षा जास्त गावांमध्ये पाणी पोहचवले; असल्‍याचे गुलाबराव यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा; तुम्हाला मिळाले का?

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या मुद्द्यावर ठाकरेसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

Saturday Horoscope: जवळच्या व्यक्तीकडून होणार फायदा, ५ राशींना पैशाची तंगी; वाचा शनिवारचे राशी

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवणारी 'हिरकणी' आई; ३ वर्षांच्या मुलीसोबत कष्टमय झुंज

Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

SCROLL FOR NEXT