Cobra 
महाराष्ट्र

कुटुंब गाढ झोपेत अन्‌ काळोख्या रात्रीत कोब्राच्‍या थराराने श्‍वास रोखला

कुटुंब गाढ झोपेत अन्‌ काळोख्या रात्रीत कोब्राच्‍या थराराने श्‍वास रोखला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रात्री साडेतीनची वेळ.. पिंप्राळ्यातील प्रशांत चौकात राहणारे कुटुंबीय गाढ झोपेत.. अचानक पलंगावर झोपलेल्या मुलाला मांजरीच्या फिस्करण्याच्या आवाजाने जाग आली. समोरचे दृश्य पाहून त्यांचे अवसान गळाले.. जमिनीवर झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना नागापासून वाचविण्याच्या प्रयत्नात मांजरीची त्या नागाशी झटापट सुरू होती. (jalgaon-news-koli-family-night-sleep-cobra-and-cat-fight)

अनंत कोळी यांच्या कुटुंबातील चार महिला जमिनीवर झोपलेल्या होत्या. त्यांच्याजवळ मांजर अंगावरचे सगळे केस ताठ करून फिस्करत होती. कारण मांजरासमोर काळरात्र बनून आलेला नाग (इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा) होता.

मांजर– नागाची लढाई

मुलाने जोरात ओरडत सर्वांना उठवले. इकडे नाग आणि मांजराची लढाई सुरू असतानाच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना पाचारण करण्यात आले. सहकारी अजय साळवे यांना घेऊन ते घटनास्थळी पोचले. तोपर्यंत मांजर हवालदिल झाली होती. श्री. सोनवणे यांनी कुशलतेने नाग ताब्यात घेतला आणि कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. अनंत कोळी यांनी गणेश सोनवणे यांचे आभार मानत वन्यजीव संरक्षण संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. नागाला फारशी उपचाराची गरज नसल्याने मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक आणि बाळकृष्ण देवरे यांना माहिती देत तत्काळ सुरक्षित अधिवासात मुक्त केले.

माझ्यापेक्षा त्या मांजराचे आभार मानले पाहिजे. या दिवसात खाली झोपलेल्या नागरिकांना सर्पदंश होण्याचा धोका जास्त असल्याने खाली झोपणे टाळा, स्वच्छता ठेवा.

- गणेश सोनवणे, सर्पमित्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT