जळगाव : रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देान वेगवेगळ्या भागातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात संशयीतांनी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल (Crime News) करण्यात आले आहे. (jalgaon news Kidnapping of two minor girls)
पहिल्या फिर्यादीनुसार १७ वर्षीय मुलगी रावेर तालुक्यातील रहिवाशी असून ती जळगाव (Jalgaon) येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. रविवार (१७ एप्रिल) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. मैत्रीण व नातेवाईकांकडे शोध घेवून माहिती न मिळाल्याने मुलीच्या वडीलांनी मंगळवार (१९ एप्रिल) रामानंदनगर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महीला पोलीस नाईक उषा सोनवणे करीत आहे.
दुसऱ्या घटनेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी १९ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता अज्ञात व्यक्तीने मुलगी घरी असतांना फूस लावून पळवून नेले. मुलीच्या पालकांनी तिचा शोधाशोध केली, परंतु कुठेही आढळून न आल्याने पालकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार (१९ एप्रिल) रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुनिल पाटील करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.