Marriage Saam tv
महाराष्ट्र

हृदयस्पर्शी! हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दाम्पत्याने केले कन्यादान

हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दांपत्याकडून कन्यादान

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

पाचोरा (जळगाव) : राज्‍यात सध्या हनुमान चालिसा, भोंगे आदींमुळे राज्याचे राजकारण धार्मिक द्वेष निर्माण करून गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अशा कुठल्याही धार्मिक द्वेषाला भीक न घालता सामाजिक सलोखा जपणारीही काही मंडळी आहे. याची प्रचीती आंबे वडगाव (ता. पाचोरा) येथे आली. गावात झालेल्या एका विवाह (Marriage) सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधले.. हिंदू मित्राच्या मुलीचे या मुस्लिम दांपत्याने कन्यादान करून एकतेचे दर्शन घडवले. (jalgaon news Kanyadan of a Hindu friend's daughter from a Muslim couple)

शिंदाड (ता. पाचोरा) येथील वाल्मीक अहिरे यांचे मित्र हाजी युनूस शाह पिंपळगाव बसवंत (नाशिक) येथे वास्तव्यास आहेत. अहिरे यांची कन्या प्रियंका हिचा विवाह आंबे वडगाव (ता. पाचोरा) येथील भास्कर शिंदे यांचे पुत्र विशाल यांच्याबरोबर आंबे वडगांव येथे झाला. विवाह निश्चितीपासून ते विवाह पार पडेपर्यंत वाल्मीक अहिरे यांचे मित्र हाजी युनूस शाह खांद्याला खांदा लावून त्यांच्यासमवेत सर्व ठिकाणी उपस्थित राहिले.

हिंदू धर्मानुसार केले कन्यादान

विवाहप्रसंगी पिंपळगाव बसवंत येथून म्हणजे सुमारे दोनशे किलोमीटरवरून पत्नी परवीन व शालकासह त्यांनी उपस्थिती दिली. विवाह सोहळा पार पडल्यानंतर हाजी युनूस शाह पत्नीसह प्रियंकाच्या कन्यादान विधीसाठी बसले व त्यांनी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात हिंदू धर्मानुसार कन्यादानाचे सर्व विधी पूर्ण केले. पवित्र रमजानचा महिना सुरू असल्याने शाह दांपत्याने या वेळी अल्लाहला देखील प्रियंकाच्या सुखी संसारासाठी विनवणी करत साकडे घातले.

अहिरे– शाह मैत्रीतील जिव्हाळा

प्रियंकाचे कन्यादान करून त्यांनी हंडा, कळशी व तांबे धातूचा कलश भेट दिला. हिंदू मित्राच्या मुलीच्या विवाहास उपस्थिती लावून व हिंदू विधीप्रमाणे तिचे कन्यादान करून मैत्रीतील जिव्हाळा, मानवतेचा ओलावा तसेच जातीय, धार्मिक एकता अहिरे व शाह या मित्रांनी सिद्ध केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT