Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: लग्न समारंभातून वधूचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

लग्न समारंभातून वधूचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव- नागपुर राष्ट्रीय महामार्गावर कालिंका माता मंदिरा जवळील हॉटेलमध्‍ये आयोजित लग्न (Marriage) सोहळ्यातून साडेतीन लाखांचे दागिन्याची पर्स लंपास झाल्याची घटना घडली. लग्नसोहळा सुरु असतांना चोट्यांच्या टोळीतील लहानग्याने सोफ्यावर ठेवलेली पर्स चोरुन नेल्याचे सिसीटीव्हीत (CCTV) कैद झाले आहे. (Live Marathi News)

जळगावातील एका हॉटेलमध्‍ये २६ जानेवारीला लग्न सोहळ्याच्या रिसेप्शनमध्ये रात्री मनोज विक्रम कोळी कुटूंबीयांसह सहभागी झाले होते. लग्न सोहळ्यात रिसेप्शन व फोटोसेशन कार्यक्रम सुरू होते. वधूचे दागिने आणि रोकड असा एकुण ३ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल असलेली पिशवी ही मनोज कोळी यांच्या पत्नीकडे होती.

अल्‍पवयीन मुलाने लांबविल पिशवी

लग्न सोहळ्यात फोटो सेशन सुरू असतांना पैसे व दागिन्यांची पिशवी ही वधू– वर यांच्या सोप्यावर ठेवली होती. पाहुण्यांशी बोलण्यात व्यस्‍त असतांना एक अल्पवयीन मुलाने सोप्यावरील पिशवी चोरून नेली. पुढे गेल्यावर त्याच्यासोबत एक तरूण देखील होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पैसे व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोध घेतला. परंतु काहीही माहिती मिळाली नाही.

पोलिसात तक्रार दाखल

अखेर त्यांनी हॉटेल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता यात अल्पवयीन मुलगा याने सोप्यावरील दागिन्यांची पिशवीसोबत असलेल्या तरूणासोबत पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर मनोज कोळी यांनी २७ जानेवारीला शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT