Jalgaon Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

सत्‍ताधाऱ्यांच्‍या दबावामुळे गुन्‍हा दाखल करण्यास टाळाटाळ; जयंत पाटील यांचा आरोप, खडसेंचा पोलिस ठाण्यात ठिय्या

सत्‍ताधाऱ्यांच्‍या दबावामुळे गुन्‍हा दाखल करण्यास टाळाटाळ; जयंत पाटील यांचा आरोप, खडसेंचा पोलिस ठाण्यात ठिय्या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दूध संघात अपहार नव्हे; तर चोरी झाली आहे. यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र पोलीस (police) प्रशासनावर सत्ताधार्‍यांचा दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. (Live Marathi News)

जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघात कोट्यावधींची चोरी झाल्याचा आरोप (Eknath Khadse) एकनाथ खडके यांनी केला होता व या प्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी कालपासून एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशन बाहेर या आंदोलन सुरू केले आहे. या दरम्‍यान राष्‍ट्रवादीचे जयंत पाटील यांनी पोलीस अधिक्षकांशी चर्चा केली. यानंतर त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. या प्रकरणी न्यायालयात जाण्यासह सर्व मार्गांचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

खडसेंचा पोलिस ठाण्यात ठिय्या

जिल्हा दूध उत्पादक संघात १४ टन लोण्यासह दूध भुकटीची बेकायदेशीररीत्या विल्हेवाट सव्वा कोटीची अफरातफर केली. याप्रकरणी कार्यकारी संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न झाल्याने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी गुरुवारी (ता.१३) शहर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. दुपारी ४ वाजेपासून पोलिस ठाण्यात दाखल खडसे रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. दरम्यान, याच प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळेही दाखल झाल्यामुळे पोलिस ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले.

कोटीचा गैरव्यवहार

११ ऑक्टोबरला दूध संघाचे अधिकारी संदीप झाडे, स्वप्नील कार्ले, नितीन पाटील, एन.व्ही.पाटील, प्रशांत बावस्कर, अशांनी दूध भुकटी (पावडर)ची तपासणी केली असता ९ मेट्रीक टन मालाची तफावत आढळून आली. लोणी व भुकटी प्रकरणात तब्बल १ कोटी ते १ कोटी ३५ लाखांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याआधारे जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित यांच्या विक्री विभागातील अधिकारी अनंत अंबिकर, महेंद्र नारायण केदार, कामगार ठेका अंतर्गत सहाय्यक सुनील चव्हाण अशांनी संगनमत करून १४ टन बटर(लोणी)च्या खोट्या नोंदी घेतल्या तसेच ९ टन दूध पावडरची परस्पर विल्हेवाट लावून १ ते १ कोटी ३५ लाखांचा अपहार केल्याचा जबाब सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT