Farmer Suicide saam tv
महाराष्ट्र

घरातील मंडळी प्रगट दिनाच्या कार्यक्रमाला; इकडे घरात शेतकऱ्याची आत्महत्या

घरातील मंडळी गजानन महाराज प्रगट दिनाच्या कार्यक्रमाला; इकडे घरात शेतकऱ्याची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

तोंडापूर (जळगाव) : कुंभारी बुद्रुक (ता. जामनेर) येथील आसाराम राणू जोशी यांनी स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पहूर पोलिसांत (police) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (jalgaon news jamner Suicide of a farmer here at home)

कुंभारी बुद्रुक (ता. जामनेर) येथील शेतकरी (Farmer) आसाराम राणू जोशी (वय ५८) यांनी बुधवारी (ता. २३) सायंकाळी सहाच्या दरम्यान घरातील महिला गजानन महाराज प्रगट दिनाच्या कार्यक्रमाला गेले असता, घरात कोणी नसल्यामुळे नैराश्य येऊन गळफास (Farmer Suicide) घेतला. आसाराम जोशी यांचे कुंभारी बुद्रुक शिवारात गट क्रमांक ८९ /२ येथे चार एकर शेत असून, त्यांच्यावर तोंडापूर विविध विकास सोसायटीचे कर्ज आहे व शेतीकामासाठी बाहेरून काढलेले कर्ज या विवंचनेत असताना अतिवृष्टीमुळे शेतातील उत्पन्न कमी झाल्याने नैराश्य येऊन आत्महत्या (Suicide) केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रात्री उशिरा गुन्‍हा दाखल

माजी सरपंच सुरतसिंग जोशी, सुनील मोरे, डिंगाबर जोशी, नंदू मडाळे व ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात येऊन पहूर पोलिसांत रात्री उशिरा पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT