महाराष्ट्र

‘मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज’ वेबसाईडवरून काढली माहिती; कुटुंबावर प्राणघातक हल्ला

‘मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज’ वेबसाईडवरून काढली माहिती; कुटुंबावर प्राणघातक हल्ला

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : वरसाडे (ता. पाचोरा) ग्रामपंचायतीच्‍या निधी खर्चाबाबत गावातील एका तरुणाने मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या वेबसाईटवरून माहिती काढली. ही माहिती सोशल मिडीयावर शेअर केली. यावरून तरुणाच्‍या कुटूंबावर प्राणघातक हल्ला झाला. (jalgaon-news-Information-extracted-from-‘Ministry-of-Panchayat-Raj-website-Assault-on-family)

वरसाडे तांडा नंबर १ या गावासाठी विविध योजनेतून आलेल्या निधीची माहिती काढून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून वरसाडे तांडाच्या ग्रुपवर टाकत आता तरी विकास कामे होऊन गाव प्रगतीपथावर येऊ द्या; असा हेतू डोळ्यासमोर ठेवून कामांना सुरुवात करा व निधीचा योग्य वापर करा असे आवाहन केले होते. परंतु या संदेशाचा गैरसमज करून सत्ताधारी सरपंच लिलाबाई शिवदास राठोड व त्यांचे पती शिवदास भुरा राठोड यांनी रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान त्यांच्या ४० ते ५० समर्थकांना सोबत घेत थेट विजयसिंह धर्मा राठोड यांच्या घरावर हल्ला चढविला.

नुकसान करत तोडफोड

रामकृष्ण राठोड यांच्या मालकीचे ॲक्वा फिल्टर प्लांटवर हल्ला चढवून प्लांटची तोडफोड केली. तसेच घरात घुसून रामकृष्ण विजयसिंग राठोड व यांची पत्नी आशाबाई राठोड व घरातील इतर सदस्यांना बेदम मारहाण केली. यात रामकृष्ण विजयसिंग राठोड व आशाबाई राठोड जखमी झाले असून आशाबाई हिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मणी तसेच इतर किंमती वस्तू गहाळ झाल्या आहेत. त्यांनी कसातरी पळ काढून जीव वाचवत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला येऊन घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे.

पोलिस आले गावात

माहिती कळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, पोलीस हे.काँ. रनजीत पाटील, संदीप राजपूत हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी वरसाडे गावात आले. यानंतर त्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT