Girna Dam News, Girna Dam Location, Girna Dam Water Level Today Saam tv
महाराष्ट्र

गिरणा धरणाच्‍या पातळीत वाढ; नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

गिरणा धरणाच्‍या पातळीत वाढ; नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : गिरणा धरणात आज दुपारपर्यंत ८० टक्के जिवंत साठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय नदीच्‍या वरच्‍या बाजूला सुरू असलेल्‍या (Heavy Rain) पावसामुळे वरून येणारा (Jalgaon News) पाण्याचा ओघ सुरू आहे. यामुळे पाण्याच्‍या पातळीत वाढ होत आहे. (Girna Dam News)

पाण्याचा सुरू असलेला प्रवाह पाहता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरणा धरणातून (Girna Dam) जास्तीचे पुराचे पाणी गिरणा नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवाप्रमाणे कमी जास्त करण्यात येईल.

१ लाख क्‍यूसेकपर्यंत विसर्ग

साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २० हजार क्यूसेक इतका राहील. तद्‌नंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १ लाख क्यूसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तो येणाऱ्या येवानुसार वेळोवेळी कमी जास्त होऊ शकतो. तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी; असे आवाहन कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्यावतीने करण्यात येत आहे. (Girna Dam Water Level Today)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Bus Accident: अचानक नियंत्रण सुटलं अन् ST बस उलटली; शिवणी नदी पुलावर मोठा अपघात

Brain Facts : दुसऱ्याला जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही जांभई का येते? 'ही' ६ कारणे वाचा

Pune : भव्य दरवाजे अन् मजबूत दगडी तट; पुण्यात लपलंय एक ऐतिहासिक ठिकाण, लोकेशन आताच नोट करा

3 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकारणात शोककळा

Maharashtra News Live Update: पुणे फेस्टिवलचे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याहस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT